सातारा / प्रतिनिधी :
भरधाव वेगाने वाईकडे जाणाऱ्या कारने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. रविवारी दुपारी बावधन ओढ्याजवळ हा अपघात झाला. अपघातात दोन जण जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी सातारा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या अपघाताचे क्षण कॅमेऱ्यात कैद झाले असून, कारचालक राजेंद्र रामचंद्र रसाळ(रा.सह्याद्रीनगर) याच्यावर वाई पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वनिता प्रवीण भोसले (वय 35, रा.केसरकर पेठ सातारा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्या व त्यांचे पती प्रवीण हे दोघे ॲक्टिव्हावरून वाईहून साताऱ्याला येत होते. प्रवीण हे गाडी चालवत होते. वाईहून परत येताना बावधन ओढ्यानजीक दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास साताऱ्याकडून वाईकडे जाणाऱ्या कारने दुचाकीला जोराची धडक दिली. त्यात वनिता व प्रवीण हे दोघे जखमी झाले असून, त्यांना ग्रामस्थांनी रुग्णालयात दाखल केले. पोलीस नाईक सुभाष धुळे याबाबत अधिक तपास करत आहेत.