सातारा / प्रतिनिधी :
नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथे झालेल्या मूकबधिर युवतीवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी आरोपींवर कडक कारवाई करावी, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
या आंदोलनात गणेश दुबळे, वैशाली दुबळे, प्रहारचे जिल्हाध्यक्ष अमोल कारंडे, राष्ट्रीय अपंग महासंघाच्या अनिता धनावडे, नंदू धनावडे, दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेचे अजय पवार, आनंदा पोतेकर आदी सहभागी होते.