ऑनलाईन टीम / सातारा :
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे सातारा जिल्ह्यात बेडची कमतरता निर्माण झाली आहे. त्यातच वडुजच्या ग्रामीण रुग्णालयातील स्थिती भयावह आहे. या रुग्णालयात ऑक्सिजन बेड शिल्लक नसल्याने एका महिला कोरोना रुग्णावर रिक्षातच उपचार सुरू करण्याची वेळ आली.