बोरगाव / प्रतिनिधी :
चिकोडी कर्नाटक येथून पुण्याचा दिशेने निघालेल्या कार चालकाचा ताबा सुटल्याने कारने चार-पाच कोलांट्या घेऊन कार मातीच्या ढिगाऱ्यावर धडकली. या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. तर तीन प्रवासी आणि कार चालक जखमी झाले असून, त्यांना सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बोरगाव पोलीस स्टेशन हद्दीत दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली.
भुजंगराव दामोदर जोशी (वय 74) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर नंदाताई भुजंगराव जोशी (62),अनुराधा प्रशांत घुमे (36) श्रीधर प्रशांत घुमे (19) चालक चिन्मय प्रकाश साधले (24) अशी जखमींची नावे आहेत.
अपघाताची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते पिंटू शेठ यांनी त्वरित घटना स्थळी धाव घेऊन जखमींना सातारा येथे उपचारासाठी दाखल केले. अपघातग्रस्त वाहन क्रेन चा सहाय्याने बोरगाव पोलीस स्टेशन येथे लावण्यात आले आहे. घटनास्थळी अब्दुल सुतार, सोहेल सुतार, हवालदार मनोहर सुर्वे, कराड महामार्ग पोलीस मदत केंद्राचे रघुनाथ कळके, ए पी आय राजू बागवान, ए पी आय बशीर मुलाणी यांनी तातडीचे मदत कार्य केले.