1.16 लाखांचा मुद्देमाल जप्त, 8 जणांवर गुन्हे
प्रतिनिधी / नागठाणे :
धोंडेवाडी (ता.सातारा) येथे तीन पानी जुगार अड्डयावर छापा टाकून 1.16 लाख रुपयांचा मुद्देमाल बोरगाव पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी सायंकाळी उशिरा ही कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धोंडेवाडी येथील मारुती मंदिराच्या पारावर काही व्यक्ती तीन पानी जुगार खेळत असल्याची माहिती सपोनि डॉ.सागर वाघ यांना मिळाली. यावेळी दुपारी 4.15 वाजण्याच्या सुमारास हवालदार बाबा महाडिक, राहुल भोये, प्रशांत मोरे, बादशाह नदाफ व गायकवाड यांनी तेथे छापा टाकला. यावेळी गोरख गणपत घाडगे (वय.52), समाधान नारायण घाडगे (42), शहाजी उद्धव घाडगे(41), विलास यशवंत शिंदे(58),संजय मारुती शिंदे(48),सुभाष अनिल घाडगे(40,सर्व रा.धोंडेवाडी, ता.सातारा), नाथाजी भानुदास पवार (37,रा.वर्णे,ता.सातारा),सुरेश बाबाजी भुजबळ (62,रा,अंगापूर,ता.सातारा) यांना तीन पानी जुगार खेळत असताना तेथून ताब्यात घेतले. त्यांच्याजवळून 5390 रुपये रोख,3 दुचाकी व 4 मोबाईल असा सुमारे 1,16,390 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
वेणेगाव येथे चोरट्या दारूधंद्यावर कारवाई
नागठाणे : वेणेगाव (ता.सातारा) येथे चोरट्या दारूविक्री अड्डयावर बोरगाव पोलिसांनी कारवाई करत सुमारे 1250 रुपये किमतीच्या 24 देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या. याप्रकरणी चंद्रकांत दिनकर सावंत ( वय 60,रा.वेणेगाव,ता.सातारा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमार हवालदार बाबा महाडिक, राहुल भोये व बादशहा नदाफ यांनी ही कारवाई केली. पुढील तपास हवालदार बाबा महाडिक करत आहेत.