प्रतिनिधी / सातारा
भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडी सातारा जिल्हा, सातारा शहर आणि सातारा ग्रामीण यांच्यातर्फे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 18 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज सर्कल, पोवई नाका याठिकाणी खासदार संजय राऊत यांनी डॉक्टरांच्या बद्दल काढलेल्या बेजबाबदार वक्तव्याचा निषेध म्हणून आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात सर्वांनी संजय राऊत आणि त्यांना पाठीशी घालणारे तिघाडी सरकार यांचा निषेध करणारे फलक हातात घेतले होते आणि त्याच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या यासाठीचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांचेमार्फत राज्यपाल भगत सिंहजी कोठारी यांना तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांना पाठवले.
यावेळी भाजप वैद्यकीय आघाडी सातारा जिल्हा संयोजक डॉ. उत्कर्ष रेपाळ, सातारा शहर संयोजक डॉ. वीरेंद्र घड्याळे, सहसंयोजक डॉ. अभिराम पेंढारकर, सहसंयोजक डॉ. अजिंक्य पवार, व्यापारी आघाडी जिल्हा संयोजक डॉ. सचिन साळुंखे, सातारा शहर उपाध्यक्ष डॉ. अजय साठ्ये, भाजप जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, सातारा शहर अध्यक्ष आणि नगरसेवक विकास गोसावी, सरचिटणीस प्रविण शहाणे, जयदीप ठुसे, विक्रांत भोसले, सातारा ग्रामीण सरचिटणीस गणेश पालखे, जिल्हा उपाध्यक्ष अॅड. प्रशांत खामकर, राहुल शिवनामे, जिल्हा चिटणीस सुनील जाधव, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष शैलेंद्र कांबळे, सातारा शहराध्यक्ष संदीप वायदंडे, आरोग्य सेवा आघाडी जिल्हा संयोजक विवेक (आप्पा) कदम युवा मोर्चा सातारा अध्यक्ष विक्रम बोराटे, उद्योग आघाडी सातारा जिल्हा संयोजक निलेश शहा, उद्योग आघाडी शहर संयोजक रोहित साने, अनुसूचित जाती मोर्चा शहर सरचिटणीस विक्रम अवघडे, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.