सातारा / प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी केलेल्या वक्त्यव्याचा निषेध भाजपच्यावतीने साताऱ्यात करत त्यांना अटक व्हावी अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली. गृहमंत्री यांनी या गोष्टीची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्वरित राजीनामा द्यावा अशीही मागणी करण्यात आली.
निषेध नोंदवताना सातारा तालुकाअध्यक्ष राजेंद्र इंगळे, सातारा तालुका सरचिटणीस गणेश पालखे, सातारा कार्यकारणी सदस्य महिला मोर्चा सुनीशा शहा, सातारा शहर युवती अध्यक्षा दीपिका झाड, युवा जिल्हा सरचिटणीस स्वप्नील बोराटे, युवा तालुकाध्यक्ष सुजित साबळे, युवती तालुकाध्यक्ष कु.पल्लवी गायकवाड, सहसंयोजिका डॉ. स्नेहा सकट, शहर कार्यकारणी सदस्य गिरिजा झाड, वैष्णवी बिल्लंपल्ली, अश्विनी सुर्वे, शमीन शेख व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.