प्रतिनिधी / म्हसवड
श्री नागोबा देवालयात देवाची सेवा करणाऱया खराडे वांगी (ता. कडेगांव, जि. सांगली) येथील वामन विष्णू जानकर उर्फ सत्यवान भानुदास मोहिते (वय 59) या सेवेकऱयाने म्हसवड व परिसरातील नागरिकांच्या मुलांना बांधकाम विभागात, बीएसटीमध्ये नोकरीला लावतो म्हणून अडीच लाख रुपये घेऊन माझ्या मुलाची फसवणूक केली. त्याचप्रमाणे इतरही लोकांकडुन तिन लाख घेऊन फसवणूक केली असल्याची तक्रार संभाजी आण्णा शिंगाडे (रा. धुळदेव ता. माण) यांनी म्हसवड पोलिसांत दिली आहे.
संबंधित आरोपी वामन जानकर हा तिन नावाची वेगवेगळी आधारकार्ड वापरुन लोकांना फसवत होता. त्याला म्हसवड पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास पीएसआय विशाल भंडारे करत आहेत.
लाखो धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेल्या म्हसवड शहरापासुन पाच किलोमीटर अंतरावरील श्री नागोबा देवालयात गेले अनेक वर्षांपासून या मंदिरात राहुन मंदिरात दिसेल ते काम करायचे. मंदिरात भाविकांची व देवाची चाकरी आजही साठ ते सत्तर नागोबा भक्त करतात. देवाच्या चाकरीला बाहेरच्या रहिवासी असलेल्या वामन विष्णू जानकर (जि. सांगली) याने गालबोट लावले. देवाला येणारे अनेकजण आपले गाऱहाणे देवापुढे गायचे. यावेळी जानकर हे त्यांचे बोलणे चोरुन ऐकायचे. जानकर याने संभाजी आण्णा शिंगाडे या भक्ताला जवळ बोलावून तुझ्या मुलाला पीडब्लूडीमध्ये नोकरी लावतो.
माझी त्या अमुकतमुक साहेबांची जवळीक आहे. तुम्ही 2 लाख रुपये द्या, मी तुमच्या मुलाला नोकरी मिळवून देतो म्हणून घेतले. शिंगाडे यांच्याकडुन पुन्हा 65 हजार घेतले असे एकूण 2 लाख 65 हजार रुपये रोख शिंगाडे यांच्याकडुन तर दुसऱया भक्तांकडुन 28 हजार, तिसऱयाकडुन 90 तर चौथ्या भक्ताकडुन 1 लाख अशी रोकड घेतली. तर एका भक्तांकडुन 50 पोती सिंमेट मंदिर बांधकामास घेऊन ते परस्पर तिसऱ्याच व्यक्तीला विकले.
मंदिर बांधकामच्या नावावर लाखो रुपयांचे लोखंड (स्टिल) हि असेच परस्पर विकले. मात्र या जानकर नामक भामटय़ाने या मंदिरात काही ब्रास फरशी दुसऱयाने दिलेली बसवलेली आहे. मंदिरात राहुन अनेकांना कधी जानकर, मोहिते, मोकाशी अशा वेगवेगळ्या नावांनी आधारकार्ड ओळखपत्रे बनवून समाजातील बंधूंना, पै पाहुणे यांना लाखो रुपये रोख, तर काही वस्तुरुपी साहित्य घेऊन फसवणाऱया वामन जानकर यांना म्हसवड पोलिसांनी शिताफीने अटक केली. अधिक तपास पीएसआय विशाल भंडारे करत आहेत.
फसवणूक झाली असेल तर तक्रार द्या-पोलिसांचे आवाहन
म्हसवड व परिसरातील नागरिकांनी त्याचप्रेमाने नागोबा भक्तांना आव्हान करण्यात येत आहे की नागोबा देवालयात राहुन अनेकांना फसवणाऱया व तिन वेगवेगळी नावे व आधारकार्ड वापरुन मंदिरात देवाची चाकरी करणारे वामन विष्णू जानकर यांनी आणखीन कोणास फसवले असल्यास किंवा मुलाला नोकरी लावतो म्हणून काम पैसे घेतले असतील तर त्वरित आपली तक्रार म्हसवड पोलिस ठाण्यात दाखल करण्याचे आवाहन सपोनि बाजीराव ढेकळे यांनी केले आहे.