प्रतिनिधी / सातारा
किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून दोन जणांनी एका युवकास मारहाण केल्याची घटना सोमवार पेठेत दि.26 रोजी रात्री 9 वाजता घडली.याप्रकरणी शाहूपुरी पोलिसात रिमा लाड (वय 30 वर्षे) , रोहन चव्हाण (वय 35 वर्षे दोन्ही रा . सोमवार पेठ सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. 27 रोजी अर्चना गंधाले यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. 26 रोजी रात्री मी स्वयंपाक करत असताना रिमा लाड त्याचे सोबत रोहन चव्हाण हे दोघे आमच्या घराच्या बाहेर उभे राहून माझे मामा सासरे व आमच्य घरातील व्यक्तिंना शिव्या देवु लागले. म्हणुन मी बाहेर आले आणि त्यांना समजुन सांगायला सुरुवात केली व त्या दोघांनी माझे ऐकले नाही व मला मारहाण करायला सुरूवात केली त्या मारहाणीम माझ्या साडीचा पदर ओढला गेला म्हणुन माझा मुलगा आर्यन मध्ये आला. त्यावेळी रिमा लाड ही तिच्या ओढणी मधुन काहीतरी लपवुन आणले होते ते काढुन रोहन चव्हाणच्या हातात दिले व त्या त्याच्या साहय्याने माझा मुलगा आर्यन याच्या हातावर कशाच्यातरी सहाय्याने मारले त्यामुळे त्याच्या हातातुन रक्त येवु लागले व ते दोघे तेथुन पळुन गेले आम्ही लगेच शाहुपुरी पोलीस स्टेशनल तक्रार देणेसाठी आलो व त्यावेळी पोलीस स्टेशन मधुन आम्हाला सिव्हील हॉस्पीटल ये उपचाराकरीता मेडीकल यादीने पाठविले म्हणुन आम्ही आर्यन याला सिव्हील हॉस्पीटल सातारा ये उपचारासाठी घेवुन गेलो. उपचार घेवुन घडले घटनेबाबतची तक्रार शाहुपुरी पोलीस ठाण्यात दिली आहे. शाहुपुरी पोलीस तपास करत आहेत.