मल्हारपेठच्या भारत मेडिकल चा उपक्रम
नवारस्ता/प्रतिनिधी
वाढत्या रुग्णांमुळे जिल्ह्यात ऑक्सिजन बेडची कमतरता भासू लागल्याने अनेक रुग्णांचे हाल होत आहेत. याचा विचार करून कराड तालुक्यानंतर पाटण तालुक्यातही मल्हारपेठ येथील भारत मेडिकलच्या माध्यमातून पहिली ऑक्सिजन मशीन दाखल झाली आहे.
पाटणसारख्या दुर्गम तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात आवड असणारे दानशूर व्यक्ती ही पुढे येऊ लागल्या आहेत. तालुक्यातील मल्हारपेठ येथील भारत मेडिकल यांचे मालक संजय जैन यांच्या पुढाकाराने तालुक्यात अत्याधुनिक अशी पहिली ऑक्सिजन मशीन दाखल झाली आहे. या मशीनच्या साह्याने ही आता तालुक्यातील ज्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज आहे त्या रुग्णांना ही मशीन मोफत मिळणार आहे. परिणामी कोरोना विरूद्धच्या लढाईत आता पाटण तालुक्यात ही बळ मिळणार आहे.