सातारा / प्रतिनिधी :
‘जय भवानी जय शिवाजी’, ‘खाली मुंडी वर पाय’, या मोदी सरकारच करायचं काय?, अशा घोषणा देत केंद्र सरकारच्या नावाने शिमगा करत मोकळी गाडी ओढून शिवसेनेने निषेध नोंदवला. या आंदोलनात युवा सेनेचे जिल्हाप्रमुख रणजितसिंह भोसले, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते, सातारा तालुका प्रमुख दत्ताभाऊ नलावडे, उपतालुकाप्रमुख रमेश बोराटे, आतिष ननावरे, शहरप्रमुख बाळासाहेब शिंदे आदी सहभागी झाले होते.