वार्ताहर / कास
सातारा जिह्यातील पर्यटनाचे आगर असणाऱ्या यवतेश्वर कास बामणोली कडे जाणाऱ्या प्रमुख रसत्याची अनेक ठिकाणी पुरती चाळण झाल्याने खड्डेमय रसत्यामुळे वाहन धारकांसह प्रवासी त्रस्त झाले असुन तात्काळ खड्डे मुजविण्याची मागणी होत आहे.
जागतिक वारसास्थळ कास पठार मिनी काश्मीर बामणोली तापोळा या विभागात जाण्यासाठी सातारा कास बामणोली हा एकमेव प्रमुख मार्ग असुन या मार्गाचे सातारा ते कास पर्यंत रुंदीकरणाचे काम सुरु आहे. अनावळे ते देवकल पर्यंत तिन ते चार किलोमिटरचे रुंदीकरण व डांबरीकरण पुर्ण गेल्या उन्हयाळ्यात पुर्ण झाले असले असुन उर्वरीत रुंदीकरणाचे काम संथगतीने सुरू झाले आहे. मात्र बोगदा ते सांबरवाडी घाट ते यवतेश्वरपर्यंत रसत्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्याने कोणता खड्डा चुकवावा असा प्रश्न वाहनधारकांना पडत असुन यवतेश्वर घाटात वाहनांचा खुळखुळा होत आहे देवकल ते पारांबे कास पर्यंत ही रसत्याची पुरती चाळण झाल्याने पावसाळ ऊघडून दोन महिने होऊनही खड्डेभरूण डागडुजी अदयाप न केल्याने वाहन धारक प्रवासी पर्यटक त्रस्त झाले असुन तात्काळ वाहतुकीसाठी रस्ता दुरुस्तीची मागणी होत आहे.
सामाजिक कार्यकर्तें वारंवार बांधकाम विभाग व संबधीत ठेकेदाराकडे रसत्यावरील खड्डे मुजवून डागडुजी करण्याची मागणी करत आहेत मात्र संबधीत विभाग व ठेकेदार या मागणीकडे जाणीव पुर्वक दुर्लक्ष करत वेळकाढू पणाचे धोरण अंवलंबत असल्याने परिसरातील वाहन धारक व नागरीक आंदोलन छेडवे लागणार असल्याचे सांगत आहेत.
सातारा कास मार्गावर आनावळे ते देवकल पर्यंतचा नवीन झालेला रस्ता वगळता उर्वरीत रसत्याची पुरती चाळण झाली असल्याने वाहनांचा खुळखुळा होत आहे प्रवासी त्रस्त झाले आहेत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही संबधीत बांधकाम विभाग व ठेकेदारला तात्काळ खड्डे भरून डागडुजी करण्याच्या सुचना दिल्या आहेत मात्र तात्काळ रोड ची दुरुस्ती न केल्यास अंदोलन छेडावे लागेल.
सोमनाथ जाधव, कास पठार वनसमीती माजी अध्यक्ष
पर्यटनस्थळे खुली झाल्याने कास रोडवर वाहनांची वर्दळ वाढू लागली आहे यवतेश्वर घाटात सर्वत्रच खड्डे पडल्याने कोणता खड्डा चुकवावा हेच कळत नाही रोज याच मार्गावरुन प्रवास करावा लागतो वाहनांचा खुळखुळ झाला असुन वाहने भंगारात विकायची कि काय ? प्रवाशांना मणक्याचा त्रास ऊदभवू लागले आहेत चार दिवसांत रोडवरील खड्डे मुजवुन मजबुतीकरण न केल्यास आम्ही भागातील वाहन धारक व नागरीक एकत्र येवुन अंदोलन छेडणार
विनोद भणगे, सांबरवाडी ग्रामस्थ