सातारा / प्रतिनिधी :
पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर रायगाव गावच्या हद्दीत सोमवारी सकाळी मालट्रक पलटी झाल्याची घटना घडली. या घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याचे सांगण्यात येते. या अपघाताची सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती. हा अपघात कसा झाला याची माहिती अद्याप समजू शकली नाही.