● जानेवारीत पहिल्या टप्यातल्या मोहिमेला प्रारंभ होण्याची शक्यता
● सातारा, खटाव, माण अजून ही दोन आकड्यात
● दररोज किमान 100 जणांना लस देण्याचा आराखडा
सातारा / प्रतिनिधी :
राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार सातारा जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाने कोरोनाच्या अनुषंगाने लसीकरण करण्यासाठी नेमलेल्या टास्क फोर्स समितीच्या तालुकानिहाय बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 22 रोजी सातारा तालुक्यातील बैठक आहे. प्रांताधिकारी, तहसीलदार, तालुका वैधकीय अधिकारी यांचा समावेश या बैठकीत असणार आहे. लसीकरण करण्यासाठी जे फिल्डवर्क करतात त्यांचे रजिस्ट्रेशन करण्यात आले आहे. लसीकरण कसे करायचे याचे प्रशिक्षण दररोज ऑनलाईन आरोग्य विभागाकडून सुरू आहे.आयडी प्रूफ पाहून मतदानाप्रमाणेच लस देण्याचे नियोजन सुरू आहे. दररोज किमान 100 जणांना लस देण्याबाबत आराखडा तयार करण्याच्या हालचाली आहेत. जानेवारीत लसीकरण मोहीम सुरू होईल असा अंदाज आरोग्य विभागाने वर्तविण्यात आला आहे.
सातारा जिल्ह्यात कोरोना बाधित होण्याचे प्रमाण आता 80 च्या घरात आहे. अजून ही सातारा, खटाव, माण हे तालुके दोन अंकी बाधित रुग्ण आढळून येण्यामध्ये आघाडीवर आहेत. कराड, वाई, पाटण हे तालुके आता सावरत आहेत.
सातारा -15
सातारा 4, विकास नगर 2, कंरजे पेठ 1, शनिवार पेठ 1, चिमणपुरा पेठ 1, शाहुपुरी 1, संभाजीनगर 1, शाहुनगर 2, निनाम 1, खेड1,
कराड -1
कराड 1,
पाटण -1
कोयनानगर 1,
फलटण -3
अरडगाव 1, साखरवाडी 1, मलटण 1,
खटाव -17
खटाव 5, कातरखटाव 1, राजाचे कुर्ले 1, वडूज 1, साठेवाडी 2, मायणी 3, पाचवड 1, कलेढोण 6,
माण -13
माण 2, म्हसवड 3,धामणी 1,दहिवडी 3, मलवडी 4,
कोरेगाव -6
कोरेगाव 5, जळगाव 1,
जावली -5
जावली 1, कुडाळ 4,
वाई -1
ओझर्डे 1
खंडाळा -8
खंडाळा 6, शिरवळ 2,
महाबळेश्वर -3
पाचगणी 3,
इतर:3, सासवडे कडेगाव 1 वाठार 1,
बाहेरील जिल्ह्यातील
5 बाधितांचा मृत्यू
जिल्हा रुग्णालय सातारा येथील वर्णे ता. सातारा 75 वर्षीय पुरुष, जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये तासगाव ता. सातारा येथील 70 वर्षीय महिला, नेले किडगांव ता. कोरेगाव येथील 68 वर्षीय पुरुष,आसले ता. वाई येथील 67 वर्षीय महिला बावडा ता. इंदापुर जि.पुणे.येथील 63 वर्षीय पुरुष, अशा एकूण 5 जणांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
शनिवारपर्यंत
एकूण नमुने……………….273756
एकूण बाधित………………54006
घरी सोडण्यात आलेले…….50792
मृत्यू…………………………1790
उपचारार्थ रुग्ण……………1424