प्रतिनिधी / सातारा
जिल्हा प्रशासनाने कोरोनाची होत असलेली गंभीर स्थिती पाहून दि. 17 ते 26 असा दहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला. त्यामध्ये 6 दिवस कडक तर चार दिवस अशंत: लॉकडाऊन आहे. स्थिती सावरण्यासाठी अस्त्र म्हणून लॉकडाऊनच्या भात्यातील बाण प्रशासनाने वापरले आता त्यातील दि. 22 हा शेवटचा दिवस आहे. उद्या म्हणजे 22 च्या मध्यरात्री बारापासून अंशतः लॉकडाऊन सुरू होत असून यामध्ये फक्त किराणा, भाजीपाला चिकन, मटण या अत्यावश्यक सेवा सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत सुरू राहणार आहेत. दरम्यान सोमवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालात 95 व मंगळवारी दिवसभरात आलेले दोन असे 97 बाधित आले असून दिवसभरात एकूण 69 नागरिकांनी कोरोनावर केलेली मात दिलासा देणारी ठरली आहे.
कराडमध्ये हॉस्पिटल फुल्ल, रुग्णांची फरफट
कराडमध्ये कृष्णा हॉस्पिटल 110, सह्याद्री हॉस्पिटल 40 तर शारदा हॉस्पिटल 30 असे बेड कोरोनासाठी आहेत. मात्र बाधितांची संख्या वाढत असल्याने शहरातील तसेच तालुक्यातील बाधित रुग्णांना व लक्षणे दिसणार्या रुग्णांना हॉस्पिटलचे उपचार वेळेवर उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी सुरू झाल्या आहेत मुळात रुग्णालयांमध्ये बेड शिल्लक नाही, असे सांगण्यात येते. त्यामुळे रुग्णांनाही उपचारासाठी फिरावे लागत आहे तर लक्षणे दिसणार्या रुग्णांना अन्य हॉस्पिटलमध्येही उपचारासाठी नकार दिला जात आहे. ही बाब गंभीर असून जिल्हाधिकारी आरोग्य जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.
बाधित संख्येत कराड प्रथम, सातारा दुसरा
लॉकडाऊन शिथील करण्यात आल्यानंतर ऍनलॉकच्या दिशेने जाताना जिल्हय़ात बाधितांची संख्या प्रचंड वाढली आहे. यामध्ये कराड एकूण रुग्ण संख्या (534) पहिल्या स्थानावर असून सातारा (417) दुसऱया तर जावली (319) तिसऱया स्थानावर आहे. वाईमध्ये 306 बाधित संख्या असून त्यापाठोपाठ पाटणमध्ये 199, खंडाळा 192, फलटण 191, खटाव 137, कोरेगाव 111, माण 84, महाबळेश्वर 64 अशी एकूण 2 हजार 554 रुग्ण संख्या असून त्यापैकी 1 हजार 370 कोरोनामुक्त झाले असून उपचारार्थ रुग्णांची संख्या 1 हजार 99 एवढी आहे.
जावली, सातारा, वाईमध्ये जास्त मृत्यू
कोरोना स्थिती सुरु झाल्यापासून जिल्हय़ात मृतांची संख्या अल्पच होती. मात्र गेल्या 15 दिवसांपासून बाधितांची संख्या वाढत असतानाचा मृतांची संख्या वाढली असून यामध्ये जावली तालुका 12, सातारा-11, वाई 11 कराड 8, खंडाळा 7, खटाव 10, कोरेगाव 3, महाबळेश्वर 1, माण 4, पाटण 9, फलटण 9, असे एकूण आतापर्यंत 85 जणांचे बळी गेले आहेत.
69 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज
यामध्ये *जावली* तालुक्यातील पुनवडी येथील 34, 55, 48, 55, 47, 42, 47, 40, 61, 47, 62 वर्षीय पुरुष, कुसुंबी 30 वर्षीय महिला,पुनवडी एक पुरुष. खंडाळा तालुक्यातील शिरवळ शिर्के कॉलनी 28 वर्षीय पुरुष, शिरवळ 42,65 व 35 वर्षीय महिला व 7 वर्षाची बालीका, 29,25 व 20 वर्षीय पुरुष, नक्षत्र सिटी पळशी 40 वर्षीय पुरुष, शिंदेवाडी फाटा 25 वर्षीय पुरुष. *माण* तालुक्यातील राजवाडी 31 वर्षीय पुरुष. *कराड* तालुक्यातील सह्यादी हॉस्पिटल 65 वर्षीय पुरुष व 47 वर्षीय महिला, , सुपने 28 वर्षीय पुरुष, तारुख 48 वर्षीय पुरुष, मलकापूर 30 , 48, 21 वर्षीय पुरुष व 75 वर्षीय महिला, हिंगनोळी 85 वर्षीय महिला, शामगाव येथील 53 वर्षीय पुरुष,ओगलेवाडी 35 वर्षीय महिला.
*वाई* तालुक्यातील परखंदी 49,38,वर्षीय पुरुष व 8 वर्षीय बालक व 38 वर्षीय महिला, नवेचीवाडी 72 वर्षीय पुरुष, धर्मपुरी 34 वर्षीय महिला.
सातारा तालुक्यातील भरतगांव 48 वर्षीय पुरुष, जिहे 70,50, 34 व 46 वर्षीय महिला व 16 वर्षीय तरुणी,45 वर्षीय पुरुष व 10 वर्षाचे बालक, करंडी 35 वर्षीय पुरुष, गोकुळनगर 15 वर्षाची बालीका.
पाटण तालुक्यातील कामरगाव येथील 40 वर्षीय पुरुष, कोयनानगर येथील 48,60 वर्षीय पुरुष, कडवे बु. येथील 35 वर्षीय पुरुष, सडादाडोली येथील 85 वर्षीय महिला, साईकडे येथील 24 वर्षीय महिला, कोयनानगर येथील 52 वर्षीय पुरुष. खटाव तालुक्यातील निमसोड येथील 47 वर्षीय पुरुष, विठ्ठलवाडी येथील 70 वर्षीय महिला. फलटण तालुक्यातील फरांदवाडी येथील 69 वर्षीय पुरुष, 5 वर्षाचे बालक व 2 महिन्याचे बाळ, सरडे येथील 55,20 वर्षीय महिला, सासवड येथील 30 वर्षीय पुरुष, हिंगणगाव येथील 32 वर्षीय पुरुष, रविवार पेठ येथील 39 वर्षीय महिला, विंचुर्णी येथील 43 वर्षीय पुरुष
मंगळवारी 2 बाधित, 2 रुग्णांचा मृत्यू
मंगळवारी जिल्हा रुग्णालय सातारा येथे द्वारे तपासणी करण्यात आलेल्यांपैकी सातारा येथील 1 व खातगुण येथील 1 असे 2 जण पॉझिटिव्ह आलेले आहेत. सातारा शहरातील खाजगी हॉस्पिटल येथे खाजगी प्रयोगशाळेत तपासणीत बाधित आलेला साबळेवाडी ता. सातारा येथील 54 वर्षीय पुरुषाचा व जिल्हा रुग्णालय सातारा येथे खतगुण ता. खटाव येथील 85 वर्षीय कोविड बाधित महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
कृष्णा’ मध्ये चाचणीसाठी नवीन उपकरणे
कृष्णा हॉस्पिटलने आणखी एक विधायक पाऊल उचलले आहे. कृष्णा हॉस्पिटलमध्ये कोरोना चाचणीसाठीची 2 अद्ययावत उपकरणे उपलब्ध झाल्याने, आता याठिकाणी प्रतिदिन तब्बल 150 ते 200 कोरोना चाचण्या करणे शक्य होणार आहे. या अत्याधुनिक उपकरणांमुळे कोरोना चाचणीच्या गुणवत्तेतही वाढ होणार असल्याची माहिती कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी दिली.
सोमवारी रात्रीच्या अहवालात 95 बाधित
काल सोमवारी रात्री आलेल्या रिपोर्ट नुसार जिह्यातील 89 आणि रात्री उशीरा अँटिजन टेस्ट किटद्वारे 6 असे एकूण 95 जणांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
कराडमधील स्थिती गंभीर : 27 बाधित
कराड तालुक्यातील उंब्रज येथील 62 वर्षीय पुरुष, वराडे 39 वर्षीय पुरुष, उंब्रज 55 वर्षीय महिला, वराडे 45, 45, 49 वर्षीय पुरुष, कालगाव 20 वर्षीय महिला, आगाशिवनगर 32 वर्षीय पुरुष, उंब्रज 36, 63 पुरुष, 25 वर्षीय महिला, कोळे 34, 25 वर्षीय पुरुष, शामगाव 34 वर्षीय पुरुष, बेलवडे, बुद्रुक 24 वर्षीय पुरुष, कासारशिरंबे 14 वर्षाची युवती, कराड 34 वर्षीय पुरुष, मलकापूर 58 वर्षीय पुरुष, कराड 27 वर्षीय पुरुष, कालवडे 67 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ, कराड 44 वर्षीय महिला, 16 वर्षाची युवती, मलकापूर 55 वर्षीय महिला, बुधवार पेठ 30 वर्षीय महिला, कालवडे 58 वर्षीय महिला, आगाशिवनगर 24 वर्षीय पुरुष, कराड 18 वर्षीय युवक यांचा समावेश आहे.
सातारा 8, वाई 6, खंडाळा 3
सातारा तालुक्यातील खावली येथील 30 वर्षीय पुरुष, खिंडवाडी 37 वर्षीय महिला, 75 वर्षीय पुरुष, रविवार पेठ, सातारा 70 वर्षीय महिला, शनिवार पेठ येथील 51 वर्षीय महिला, नागठाणे, गणेशवाडी येथील 45 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ, सातारा येथील 39 वर्षीय पुरुष. वाई तालुक्यातील बोपेगाव 41 व 35 वर्षीय पुरुष, शेंदुरजणे 65वर्षाचा पुरुष, 12 वर्षाचा युवक, 48 वर्षाचा पुरुष व 28 वर्षाची महिला. खंडाळा तालुक्यातील नायगाव 38 वर्षीय पुरुष, शिरवळ 33 वर्षीय पुरुष, 71 वर्षीय महिला.
फलटणमध्ये चिंता वाढली 17 बाधित
फलटण तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या 191 असून सोमवारच्या अहवालात 17 बाधितांमध्ये लक्ष्मीनगर, फलटण 42 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय महिला, 49 वर्षीय पुरुष, 45 वर्षीय पुरुष, सासवड 24 वर्षीय महिला, वारेवस्ती, खामगाव 62 वर्षीय पुरुष, 55 वर्षीय महिला, 24, 52, 25, 22, 70, 26 वर्षीय पुरुष, 45 व 20 वर्षीय महिला, साखरवाडी लक्ष्मीवाडी 50 वर्षीय पुरुष, 19 वर्षाची महिला यांचा समावेश आहे.
खटाव 9, पाटण 5, म’श्वर 9
खटाव तालुक्यातील वडूज येथील 32 व 26 वर्षीय महिला, डिस्कळ येथील 58 वर्षीय महिला, 47 वर्षीय पुरुष, 59 वर्षीय महिला, वडूज 23 वर्षीय महिला, नेर येथील 63, 45 वर्षीय पुरुष. माण तालुक्यातील दहिवडी 65 वर्षीय पुरुष. कोरेगाव तालुक्यातील बनवडी 64 वर्षीय पुरुष, वाठारकिरोली 85 वर्षीय महिला. पाटण तालुक्यातील नेरले 51, 52 वर्षीय पुरुष, 45, 15, 28 वर्षीय महिला. महाबळेश्वर तालुक्यातील गोडवली 20, 18, 36, 27 वर्षीय पुरुष, 20, 25, 46 वर्षाची महिला व 1 वर्षाची बालिका, भिलार 38 वर्षीय पुरुष.
अँटिजन टेस्ट्सनुसार जावली तालुक्यातील दापवडी 29 वर्षीय महिला, 56 वर्षीय पुरुष, शाहूनगर, सातारा 38 वर्षीय पुरुष व 2 वर्षाचा बालक, वाई तालुक्यातील शेंदुरजणे 30 वर्षाची महिला, 4 वर्षाची बालिका, 13 वर्षाचा युवक, सिध्दांतवाडी 34 पुरुष, 3 वर्षाची बालिका, पोलीस लाईन, वाई 32 वर्षीय पुरुष, असे एकुण 10 जण बाधित.
602 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा 63, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय 65, ग्रामीण रुग्णालय फलटण 26, कोरेगांव 27, वाई 81, शिरवळ 86, रायगाव येथील 41, पानमळेवाडी 27, मायणी 32, महावळेश्वर येथील 4, पाटण 35, खावली 27 व कृष्णा मेडिकल कॉलेज 88 असे एकूण 602 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
मंगळवारपर्यंत जिल्हय़ात
एकूण बाधित 2,557
एकूण मुक्त 1,439
एकूण मृत्यू 87
उपचारार्थ रुग्ण 1,031
मंगळवारी
एकूण बाधित 97
एकूण मुक्त 69
एकूण मृत्यू 02