वडूज / प्रतिनिधी
कातरखटाव, कलेढोंण,अंबवडे, बनपुरी येथे अवैध दारू व जुगार अडयावर एकाच रात्री वडूज व मायणी पोलिसांनी छापा टाकून १७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर २१,४१४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत वडूज पोलीस ठाण्यातुन मिळालेली अधिक माहिती अशी की, कातरखटाव गावचे हद्दीत पत्र्याचे शेडमध्ये उघडयावर तोंडास मास्क न लावता व सोशल डिस्टंन्सिंगचे पालन न करता सातारा जिल्हाधिकारी यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तयार केलेल्या नियम व आदेश लागू असतानाही ते न पाळता बेकायदा बिगर परवाना पत्त्याचे पानावर तीन पानी जुगार खेळत असताना पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तर तीन पानी जुगाराचे साहित्य व रोख रक्कम, मोबाईल असा एकुण १०४३०/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कलेढोण येथे जुगार खेळणारे नवनाथ हिराचंद माळी, अक्षय नंदकुमार खरात, संतोष रामचंद्र राजमाने तिन्ही रा- कलेढोण यांच्याकडे २०५०/- रुपये माल मिळून आला. तर कलेढोण येथे दुसऱ्या ठिकाणी जुगार खेळताना सचिन वसंत खरात (वय २८) प्रदिप काशिनाथ खरात (वय ६३) प्रविण खरात( वय ५०) , विनोद खरात( वय- ५०) संतोष शिंदे वय ३७) अशोक खरात( वय -६८) सर्व रा- कलेढोण, विनायक धेंडे (वय४0) रा. खानापूर ता. खानापूर जि- सांगली यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडे तीन पानी जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा एकुण ५७२० / रू. चा मुद्देमाल मिळाला आहे. तर अंबवडे येथे वैभव वाघोळे रा. अंबवडे हा अवैध दारू विक्री करत असताना आढळून आलेल्या इसमाकडून १५६०/- रुपयांची अवैद्य दारू मिळून आली. तर बनपुरी येथे अवैध दारू विक्री करताना आरोपी हिम्मत बाळू पाटोळे (रा- बनपुरी) हा आढळून आला. त्याच्याकडून १६५४/- अवैद्य दारू साठा मिळाल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली.
ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक मालोजीराजे देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत महिला पोउनि शीतल पालेकर, पो.कॉ. बापू खंडेकर, संग्राम बाबर, नितीन निकम, संदिप शेडगे, नवनाथ शिरकूळे, दीपक देवकर, दर्याबा नरळे, गणेश शिरकुळे, प्रवीण सानप, योगेश सूर्यवंशी, महेंद्र खाडे यांनी सहभाग घेतला होता.