प्रतिनिधी / सातारा
सातारा तालुक्यातील वर्णे येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने स्वच्छता करून वृक्षारोपण करण्यात आले.सेवा सप्ताहाचा एक भाग म्हणून स्वच्छता अभियान भा. ज. पा सातारा जिल्हा अध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुका अध्यक्ष राजेंद्र इंगळे यांच्या पुढाकाराने पार पडला.
यावेळी महिला मोर्चा सातारा तालुका अध्यक्षा सौ.मोनाली पवार, युवा मोर्चा सरचिटणीस कुलदीप सपकाळ, तालुका उपाध्यक्ष सुनील जाधव, महिला मोर्चा चिटणीस सौ.सारिका मदने, सौ.पूनम बाबर, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष तेजस काकडे, तसेच वर्णे व निगडी मधील कार्यकर्ते सागर पवार, नवनाथ पवार, मनोज सुर्यवंशी, संजय मदने, रमेश पवार, सुजित काळगे व पदाधिकारी उपस्थित होते.