वाई / प्रतिनिधी :
वाईच्या ब्राह्मणशाही परिसरातील तृप्ती लॉजवर अनैतिक कृत्य चालत असल्याची माहिती वाई पोलिसांना मिळाली होती. त्यावरून वाई पोलिसांनी छापा टाकून एकाला अटक केली आहे. तर तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
बसराज माणिक मान्याळ (वय 43, रा.बोधेवाडी ता.कोरेगाव) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर मन्याळसह नवनाथ उर्फ पप्प्या अनिल जाधव (रा.बावधन), जयदीप जयंत खामकर (रा.ब्राम्हणशाही वाई) यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.