सातारा / प्रतिनिधी : वाईच्या सोनगिरवाडी येथील वरद हॉस्पिटलच्या परिसरात गॅरेजच्या पाठीमागे मटका अड्डा चालवणाऱ्या प्रमोद नारायण झाडगे (वय 38, रा. शिवाजीनगर सोनगिरवाडी, वाई) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून मटक्याचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.
याबाबत वाई पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वाई येथील वरद हॉस्पिटलच्या परिसरात गॅरेजच्या पाठीमागे दि.15 रोजी सांयकाळी 5.30 वाजता मटका सुरु असल्याची माहिती वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांना मिळाली. त्यांनी पोलीस पथकास सुचना देताच तेथे छापा टाकला असता प्रमोद नारायण झाडगे हा मटका चालवत असल्याचे आढळून आले. त्याच्याकडे मटक्याचे 1202 रुपयांचे साहित्य हस्तगत केले असून, त्याच्यावर महाराष्ट्र कायदा कलम 12 अ नुसार गुन्हा दाखल केला असून हवालदार धायगुडे हे तपास करत आहेत.