प्रतिनिधी / वाई
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या आदेशानुसार व पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते आणि विभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांच्या मार्गदर्शनानुसार वाई पोलिसांनी नियमांचे पालन न करणाऱ्या व मास्क न वापरणाऱ्या ६९ जणांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी दिली.
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिलेल्या आदेशानुसार व पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते आणि विभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांनी दिलेल्या सूचनेनुसार वाई पोलीस ठाण्याच्या हद्दीत जे नागरिक नियमांची पायमल्ली करतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. दि.०५ रोजी वाई पोलीस ठाण्याकडून सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या ६९ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ३४ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
यापुढेही विना मास्क घराबाहेर पडणाऱ्या, सोशल डिस्टनन्सचे पालन न करणाऱ्या, ५ पेक्षा जास्त एकत्र येणाऱ्या नागरिकांविरुद्ध रोज कारवाई करण्यात येणार आहे. तरी सर्वांनी नियमांचे पालन करावे असे आवाहन वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी केले आहे.