सातारा / प्रतिनिधी :
सातारा शहरातील हाकर्स धारकांचा बायोमेट्रिक सर्व्हे आजपासून सुरू झाला आहे. सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या सूचनेनुसार हा सर्व्हे सुरू असून शहरातील हॉकर्स धारकांनी मोबाईलला आधार लिंक करून घ्यावीत, असे आवाहन हॉकर्स संघटनेचे सातारा शहर अध्यक्ष संजय पवार यांनी केले आहे. सातारा शहरात फेरीवाले हॉकर्स यांचा बायोमेट्रिक सर्वे यापूर्वी सुरू होता. मात्र, लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर हा सर्व्हे थांबवण्यात आला होता. पुन्हा नव्याने आज पासून बायोमेट्रिक सर्व्हेला प्रारंभ झाला आहे.
सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या सूचनेनुसार पालिकेचे अधिकारी दिवेकर, श्रीमती साळुंखे, श्रीमती जोशी, सर्व्हे अधिकारी जोशी हे सर्व करत आहेत. या सर्व्हे च्या अनुषंगाने सातारा जिल्हा हॉकर्स संघटनेचे जिल्हाध्यक्ष सादिक पैलवान, जिल्हाकार्याध्यक्ष संदीप माने, जिल्हा सरचिटणीस श्याम चिंचणे, मार्गदर्शक राम हादगे, दीपक शिंदे सातारा, शहराध्यक्ष संजय पवार यांनी सातारा शहरातील सर्व हॉकर्स धारकांनी या बायोमेट्रिक सर्व्हेला सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.