प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहरात परदेशातून आलेल्या एक जण ओमिक्रोन बाधित आढळून आला. तो रुग्ण ठणठणीत असून त्यास सर्दी, तास, खोकला अशी कोणतीही लक्षणे नाहीत. त्याचे निकटवर्तीयाचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आली. त्यामुळे सातारकरांनी घाबरुन जाण्याचे काही कारण नाही.
जे परदेशातून आले आहेत. त्यांची तपासणी करणे हे आरोग्य विभागाचे काम आहे. त्यानुसार सातारा शहरात 18 वर्षीय युवती परदेशातून आली. तिचे स्वाब घेण्यात आले होते. तिला कोणतेही लक्षण नव्हती. सर्दी, खोकला, ताप नव्हता. तिची तब्बेत ठिक असून तिच्यासोबत जे जे सहवासात आले होते. त्यांचे आरटीपीसीआर करण्यात आले होते. त्याचे अहवाल निगेटीव्ह आले. ओमिक्रोनचा सातारा शहरात जरी शिरकाव झाला असला तरीही त्या युवतीची प्रकृती चांगली आहे. तीला घरीही सोडण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आली.