प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहर व तालुक्यातील बाधितांचा आकडा मोठा होत चालला आहे.मृत्यू दर वाढत आहे.शहरात दोन दिवसात तब्बल सहा जणांचा बळी कोरोनामुळे गेला आहे.ही चिंतेची बाब बनली आहे.तालुक्यातील ग्रामीण भागात दोन जणांचा मृत्यू झाला आहे.पोलिसांची घेण्यात आलेल्या अँटी जेन चाचणीत बाधीत आढळून येत आहेत.क्षेत्र माहुलीत लमाण तांडय़ात एक बाधित तर रविवार पेठेतल्या कैकाडी गल्लीत एक जण बाधित आढळून आला आहे.
सातारा शहरात अक्षरशः कोरोनाचा कहर सुरू आहे.बाधित होण्याचे आणि मृत्यूचे प्रमाण प्रशासनापुढे डोकेदुखी ठरू पाहत आहे.हॉस्पिटलमध्ये जागा नसल्याने घरच्या घरी राहून ज्यांच्यात लक्षणे नाहीत पण बाधित आहेत त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.गेल्या दोन दिवसात शहरात सहा जणाचा बळी गेला आहे.त्यात शनिवार पेठेतील 64 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठेतील 53 वर्षीय महिला, गोडोली ता. सातारा येथील 80 वर्षीय महिला, मंगळवार पेठेतील 61 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठेतील 73 वर्षीय महिला, गडकर आळीतील 57 वर्षीय पुरुष यांचा मृत्यू झाला आहे.तर तालुक्यातील फडतरवाडी ता. सातारा येथील 40 वर्षीय पुरुष,खोडद ता. सातारा येथील 63 वर्षीय पुरुष यांचा मृत्यू झाला आहे.गेल्या दोन दिवसात आढळून आलेले रुग्ण शाहूपुरी 9, शेंद्रे 1, निंब 6, मेघदूत कॉलनी कोडोली 3, सातारा शहरातील शनिवार पेठ 4, गुरुवार पेठ 3, सिव्हील 2, शुक्रवार पेठेतील सुर्या कॉप्लेक्स 1, मंगळवार पेठ 2, करंजे 1, शिवथर 1, शाहूपुरी पोलीस स्टेशन 1, न्यु विकासनगर खेड 1, खावली 1, शनिवार पेठ 2, सदर बझार 1, उत्तेकर नगर 1, मंगळवार पेठेतील दस्तगीर कॉलनी 1, देगाव 1, गोडोली 1, पोलीस हेडक्वार्टर वसाहत 1, कोडोली 1, धावडशी 1, सातारा शहरातील मंगळवार पेठ 7, सातारा पोलीस स्टेशन 2, राजमाता सुमित्राराजे कॉलनी शाहूनगर 2, शुक्रवार पेठ 1, देवी चौक 1, प्रतापगंज पेठ 1, बुधवार नाका 2, सर्कल हाऊस 2, बुधवार पेठ 1, सुर्यवंशी कॉलनी दौलतनगर (सातारा) 2, गुरुवार पेठ 1, शुक्रवार पेठेतील जिजामाता कॉलनी 2, शाहूपूरी 1, गोडोली 1, लिंबाचीवाडी1, चिंचणेर निंब 2, पिरवाडी 1, डबेवाडी 1, अतित 1, शहापूर 1, कोडोली 1, काशिळ 1, सातारा 1, सातारा शहर 2 असे बाधित आहेत.
दि. 14 रोजी सातारा शहरात एकूण बाधित व्यक्ती 27 होते.नवीन झालेले कंटेन्मेंट झोन पुढील प्रमाणे 187 गुरुवार पेठेतला 1 बाधित, 389 गुरुवार पेठतला 1 बाधित, 376, 377 मंगळवार पेठ येथील 1 बाधित, 659 गुरुवार पेठ येथील 2 बाधित,577 गुरुवार पेठ येथील 1 बाधित,151 गोडोली येथील 1 बाधित, सर्किट हाऊस येथील 2 बाधित, 286 शनिवार पेठ येथील18 बाधित सापडले होते. तर दि.15 रोजी
सातारा शहरात एकूण 9 बाधित आढळून आले ते असे 465 मंगळवार पेठ येथील 1 बाधित, देवी चौक येथील 1 बाधित, 107 स्वराज्य नगर गोडोली येथील 3 बाधित, 242 रामाचा गोट येथील 1 बाधित, रविवार पेठ येथील 1 बाधित, 63 यादोगोपाल पेठ येथील1 बाधित, 643 गुरुवार पेठ येथील1 बाधित आढळून आले.