प्रतिनिधी/सातारा :
छत्रपती संभाजीराजे यांची जयंती सातारा शहरासह जिह्यातील विविध शंभू भक्तांनी साजरी केली.दरवर्षी सातारा शहरात मैत्री प्रतिष्ठान छत्रपती संभाजीराजे यांची जयंती साजरी करते.याही वर्षी लॉक डाऊन असल्याने साधेपणाने भक्तीपूर्ण अशी साजरी करण्यात आली.शाहू चौकात स्व.अभयसिंहराजे भोसले उद्यानात असलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या शिल्पाकृतीला कृष्णा नदीचे संगममाहुली येथून पाणी आणून अगोदर जलाभिषेक करण्यात आला.त्यांनंतर दुग्धअभिषेक करण्यात आला.यावेळी मैत्री प्रतिष्ठानचे हर्षल चिकणे,ओंकार शिंदे, सुमित गवळी, आकाश जगताप, प्रवीण सावंत, प्रथमेश कानडे यांनी घोषणा देत साजरी केली.दिवस भर छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या जात होत्या.