प्रतिनिधी/ सातारा
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने शिवसेना सातारा शहर व शिवप्रेरणा प्रतिष्ठानच्यावतीने दिनदर्शिकेचे अनावरण शिवसेनेचे उपनेते प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा प्रमुख यशवंत घाडगे, जयवंत शेलार, चंद्रकांत जाधव, महिला संघटीका शारदा जाधव, अनिता जाधव, सातारा शहर प्रमुख बाळासाहेब शिंदे, उपशहरप्रमुख शिवाजीराव इंगवले, प्रकाश भोसले, कुमार पोतदार, दीपक पाटील, निलेश शिंदे, मनोज निंबाळकर, ऍड. विनोद निकम, दर्शन लाहोटी यांनी सहकार्य केले.