प्रतिनिधी / सातारा
सातारा येथील शाहुपूरीत गंगासागर कॉलनीत सुभाष शंकर मुळे वय 61 हा बेकायदेशीरपणे दारु विक्री करत असल्याची माहिती शाहुपूरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पंतगे यांना मिळाली होती. त्यांनी पोलीस ठाण्याचे पथकास सुचना दिल्या. पोलीस हेड कॉन्स्टेबल हसन तडवी, पोलीस नाईक सचिन माने, महिला पो. ना. वैशाली लोखंडे, पो. कॉ. ओंकार यादव, पंकज मोहिते, धीरज बेसके यांनी छापा टाकून सुभाष मुळे यास एका खाकी पुठ्ठय़ाचे बॉक्स सह ताब्यात घेतले.
त्याच्याकडील बॉक्सची तपासणी केली असता त्यामध्ये मॅकडोवेल्ल व्हिस्की, इम्पेरियल ब्ल्यू व्हिस्की, देशी दारू मनोरंजन संत्रा अशा 5,300/-रु. किंमतीच्या 44 देशी विदेशी दारुच्या बाटल्या मिळून आल्या आहेत.