सातारा / प्रतिनिधी :
सातारा शहराच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या शाहूपुरीमध्ये गेल्या दोन दिवसांपासून एका बिल्डरने चक्क रांगोळे कॉलनीतला ओढाच गळफाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
संबंधित बिल्डर स्वतः हेे काम करत असून, शाहूपुरी रस्त्याकडेचा मुरूम उचलून तो मुरूम ओढ्यात नेऊन टाकला जात आहे. त्या जागेत प्लॉटिंग करून जागा विक्री करण्यासाठी संबंधित जागा मालकाचा हा प्रकार सुरू आहे. ओढा बुजवण्याच्या प्रकारामुळे पावसाळ्यात याच ओढ्याचे पाणी अन्य ठिकाणी लगतच्या परिसरात शिरण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, ओढ्यावर राडारोडा टाकून भराव टाकण्याचे काम कोणाच्या परवानगीने सुरू आहे, याचीच चर्चा शहरात सुरू आहे.