प्रतिनिधी / सातारा
वाई तालुक्यातील व्याजवाडी येथील किल्ले वैराटगड येथे शिवक्रांती हिंदवी सेनेच्या कार्यकर्त्यांनी संवर्धन मोहीम राबवली. गडावरील पहारेकऱ्यांच्या देवड्यांच्या परिसरातील गवत काढून स्वच्छता करण्यात आली. वाई,व्याजवाडी, भुईंज, बावधन, सातारा, जावली, पाचवड येथील कार्यकर्ते सहभागी झाले होते.दिवसभर कार्यकर्ते श्रमदान करत होते.