तुळजाभवानी सहकारी पतसंस्थेकडून ऑक्सिजन मशिन भेट
प्रतिनिधी / नागठाणे
कोरोना साठरोगाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी शेंद्रे (ता. सातारा) येथील व्यापारी व ग्रामस्थांनी मिळुन दहा दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचे ठरवले आहे. या दहा दिवसात अत्यावशक सेवा वगळता सर्व प्रकारची दुकाने भाजी मंडई पुर्णपणे बंद ठेऊन सहकार्य करावे असे आवाहन ग्रामपंचायंत शेंद्रे यांच्याकडून करण्यात आले आहे. त्याचबरोबर गावात ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहीम सुद्धा आशा स्वयंसेविक मार्फत सुरू आहे.
ग्रामपंचायतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक दानशुर व्यक्ति व संस्थांनी सढळ हातांनी मदत केली आहे. नुकतेच येथील तुळजाभवानी सहकारी पतसंस्थेकडुन ऑक्सिजन मशीन ग्रामपंचायतीकडे सुपुर्त करण्यात आली. यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी संजय ढमाळ यांनी तुळजाभवानी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक, चेअरमन बजरंग कदम यांचे आभार मानले. तसेच आपणासारख्या दातृत्व करणाऱ्या व्यक्तिंनी पुढे येऊन निस्वार्थ समाजकार्य करावे असे मत संजय ढमाळ यांनी व्यक्त केले.
यावेळी मंडल अधिकारी नितिन घोरपडे, विस्तार अधिकारी काकडे, तलाठी ढाणे, ग्रामविकास अधिकारी गोविंद माने, प्रकाश काशीद, अमर मोरे, विष्णु जाधव, अमोल कदम, चद्रकांत जाधव, आनंदा वाघमारे, विजय पोतेकर ग्रामपंचायत कर्मचारी, आशा वर्कर व ग्रामस्थ उपस्थित होते.
कोरोना सारख्या माहामारीच्या काळात तुळजाभवानी सहकारी पतसंस्था जनहितासाठी बिकट परिस्थितीमध्ये सतत अग्रस्थानी असेल. तसेच संस्थेच्यावतीने दिलेले हे ऑक्सिजन मशीन एकाच्या जरी कामी आले तरी आम्ही केलेल्या या कामाचे सार्थक झाले असे समजेन. ऑक्सिजन किट ही काय फार मोठी बाब नाही परंतु त्याच्या योग्य उपयोगामुळे कोणाचे तरी अमुल्य प्राण वाचले तर यात आमचे समाधान असेल.
-बजरंग कदम(सर), संस्थापक चेअरमन, तुळजाभवानी सहकारी पतसंस्था, शेंद्रे