प्रतिनिधी/ नागठाणे :
शेंद्रे (ता. सातारा) येथे सोमवारी (ता. १४) महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने मधमाशा पालनाबाबत तांत्रिक प्रात्यक्षिक व जनजागृती शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक भवनात सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत वाघेश्वरी ॲग्रो शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत हे शिबिर होणार आहे. शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन वाघेश्वरी ॲग्रो कंपनीच्या अध्यक्षा वेदांतिकाराजेभोसले, मधसंचालनालयाचे संचालक डी. आर. पाटील, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी एन. एम. तांबांळी यांनी केले आहे. शिबिरात मध योजना, शासकीय योजना, कृषी योजना, आत्मा योजना, निसर्गातीलवसाहतींचे संकलन व संगोपन, मधाची गुणवत्ता व तपासणी याबाबतचे मार्गदर्शन तसेच मधमाशा पालनाबाबत शासकीय तज्ज्ञ अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे.