नागठाणे / प्रतिनिधी :
शेळकेवाडी (ता. सातारा) येथील अंगणवाडी सेविका शकुंतला नारायण सूर्यवंशी यांनी सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवित ऊस तोडणी कामगारांच्या मुलांना नवे कपडे तसेच खाऊचे वाटप केले.
शकुंतला सूर्यवंशी यांच्या पूनम व तनुश्री या दोन नातींचा अलीकडेच वाढदिवस झाला. त्याचे ओैचित्य साधत कपडे व खाऊ वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला संत तुकाराम महाराज वारकरी संस्थेचे अध्यक्ष संभाजी शेळके, अंकुश शेळके, महादेव शेळके, नथुराम शेळके, किरण शेळके तसेच ग्रामस्थांची उपस्थिती होती. कार्यक्रमात बोलताना संभाजी शेळके यांनी सूर्यवंशी कुटुंबाच्या उपक्रमाचे कोैतुक केले.