सातारा : संगम माहुली येथील श्रीमंत छत्रपती शाहूमहाराज थोरले यांच्या समाधी स्थळाचे लोकार्पण राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.
सन 1649 मध्ये श्रीमंत छत्रपती शाहूमहाराज थोरले यांच्या निधनानंतर त्यांचे अंत्यसंस्कार साताऱ्यातील संगम माहुली येथे करण्यात आले होते. त्याच ठिकाणी त्यांची समाधी होती. या गोष्टीला 371 वर्ष होऊन गेले. पावसाळ्यात येणाऱ्या पुरामुळे हे समाधी स्थळ वाळूमध्ये गाडले गेले होते. सातारा येथील इतिहास तज्ञ अजय जाधवराव व लोहिया यांनी राजमाता कल्पनाराजे यांचा आदेशाने या समाधीच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू केले. आज या नूतन जीर्णोद्धार केलेल्या समाधी स्थळाचे लोकार्पण करण्यात आले.