प्रतिनिधी/नागठाणे
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यानी जमावबंदी व संचारबंदी आदेश लागू करूनही त्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी भैरवगड ग्रुप ग्रामपंचायत (ता.सातारा) येथील वाड्यांमधील सुमारे अठरा युवकांविरुद्ध बोरगाव पोलीस ठाण्यात काल, शनिवारी (दि.4) रात्री उशिरा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे सर्व युवक मुंबई येथील रहिवासी आहेत.
राज्यात कोरोना विषाणू रोगप्रसार रोखण्यासाठी त्या अनुषंगाने जिल्ह्यात जमावबंदी, संचारबंदी लागू केला असून सार्वजनिक कार्यक्रम व गर्दी करू नये असे आवाहन करण्यात आले आहे. असे असतानाही भैरवगड ग्रुप ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत येत असलेल्या गवळणवाडी व पिरेवाडी येथे काही युवक या आदेशाचे उल्लंघन करत होते. काल, शनिवारी दुपारी ग्रामसमितीचे पोलीस पाटील किरण फणसे, तलाठी रामचंद्र कुंभार, ग्रामसेवक निलेश गुरव, सरपंच रामचंद्र साळुंखे यांनी गावात पाहणी केली.
यावेळी
पिरेवाडी येथे दौलत लक्ष्मण
साळुंखे, विनायक
उत्तम मोरे, वैभव
प्रकाश मोरे, गणेश
लक्ष्मण मोरे, विनय
प्रकाश शिंदे, शहाजी
लक्ष्मण साळुंखे, सुमित
रामचंद्र शिंदे, प्रतीक
लक्ष्मण शिंदे, प्रेम
बजरंग मोरे, अशोक
भगवंत शिंदे, जगन्नाथ
सखाराम शिंदे (सर्व
.रा पिरेवाडी,ता
सातारा) हे युवक
गावातील विठठल-रखुमाई
मंदिरात झोपलेली आढळली.
तर गवळणवाडी (ता.सातारा)
येथे विजय ज्योतिराम
झोरे,नवनाथ लक्ष्मण
झोरे, धीरज आनंदराव
झोरे, सूरज अशोक
झोरे, विशाल कृष्णा
झोरे,नितीन सर्जेराव
झोरे,दिलीप लक्ष्मण
माने हे युवक एकत्र फिरत असताना
आढळले. या सर्वांविरोधात
बोरगाव पोलीस ठाण्यात भारतीय
दंड विधान कलम १८८,२६९,मुंबई
पोलीस अधिनियम १३५ व राष्ट्रीय
आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम
५१ (ब) अन्वये
गुन्हे दाखल केले आहेत.
पुढील तपास हवालदार
स्वप्नील माने करत आहेत.
भैरवगड
सरपंचास ग्रामस्थाची धमकी
बोरगाव
पोलिसांनी भैरवगड ग्रुप
ग्रामपंचायती अखत्यारीत
असलेल्या वाड्यांमधील युवकांवर
कारवाई केल्याने गवळणवाडी
(भैरवगड) येथील
ग्रामस्थ शंकर जानू झोरे याने
सरपंच रामचंद्र बाळू साळुंखे
यांना ‘ तुम्ही गावात
पोलीस गाडी फोन करून बोलवून
घेता.१५ तारखेनंतर
तुला बघून घेतो’ अशी
धमकी देत शिवीगाळ, दमदाटी
केली. याप्रकरणी
बोरगाव पोलीस ठाण्यात झोरे
याच्याविरोधात अदखलपात्र
गुन्हा दाखल करण्यात आला आहे.