प्रतिनिधी/सातारा
सातारा जिल्ह्यात आज आणखीन सात जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. आमोद गडीकर यांनी ही माहिती दिली.
यामध्ये सातारा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या सातारा तालुक्यातील वडुथ येथील 63 वर्षीय पुरुष कोविड बाधित असल्याचे संबंधित हॉस्पिटलने कळविले आहे.
यात जावली तालुक्यातील म्हातेखुर्द येथील 38 वर्षीय पुरुष व 11 वर्षीय मुलगा. फलटण तालुक्यातील कोरेगाव येथील 26 वर्षीय महिला. कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथील 44 वर्षीय पुरुष. पाटण तालुक्यातील आचरेवाडी येथील 38 वर्षीय पुरुष. कराड तालुक्यातील कोयना वसाहत येथील 40 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.