प्रतिनिधी / सातारा
सातारा पोलीस दल गुन्ह्यांच्या तपासात नेहमीच अग्रेसर राहिले आहे. पोलिसांनी अनेक कठीण गुन्हे उघडकीस आणले असून ते गुन्हे उघडकीस आणण्यास पोलीस दलात असलेल्या श्वानांची मदत होत असते. मुक्या प्राण्यांना देखील पोलिस प्रेम, जिव्हाळा,आपुलकीची वागणूक देत असतात. येथे असलेल्या श्वानाची देखभाल कुटुंबातील सदस्यांप्रमाणे बीडीडी एसचे पोलीस कर्मचारी घेत असतात.
सातारा पोलीस दलात कामगिरी बजावणाऱ्या ‘सुर्या’ या श्वानाचा केक कापून दुसरा वाढदिवस साजरा करण्यात आला. उकडलेल्या अंड्यांना फुलांचा आकार देऊन सजावट करण्यात आली होती आणि मधोमध केक ठेऊन सूर्याला खाण्यास देण्यात आला. यावेळी सूर्याला वाढदिवसाच्या आणि पुढील उत्कृष्ट कामगिरीसाठी पोलिसांकडून शुभेच्छा देण्यात आल्या.