सातारा / प्रतिनिधी :
शहराची हद्दवाढ झाल्याने शाहुपूरी भागाला प्राधान्य देण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांचे कार्यकर्ते बाळासाहेब ढेकणे यांनाच स्वीकृतवर संधी मिळण्याची दाट शक्यता साविआच्या गोटात सुरु आहे. सातारा विकास आघाडीच्या कोट्यातील स्वीकृत नगरसेवक पद रिक्त असल्याने ते पद निवडण्यासाठी विशेष सभा दि.29 रोजी दुपारी 2 वाजता पालिकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. त्या दिवशी बाळासाहेब ढेकणे हे सभागृहात नगरसेवक म्हणून दिसणार आहेत.
बाळासाहेब ढेकणे हे यापूर्वी एकदा नगरसेवक होते. नागरिकांच्या प्रश्नांसाठी ते सातत्याने झटत असतात. खासदार उदयनराजे यांचे ते खंदे समर्थक आहेत. शाहुपूरीसह उपनगरात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. नुकतीच हद्दवाढ झाल्याने खासदार उदयनराजे यांच्या साविआकडून हद्दवाढीत समाविष्ठ झालेल्या भागातील कार्यकर्त्यास स्वीकृत नगरसेवक म्हणून सातारा पालिकेत काम करण्याची संधी देण्याच्या हालचाली सुरु होत्या.
सातारा विकास आघाडीचे स्वीकृत नगरसेवक प्रशांत आहेरराव यांनी वरिष्ठांच्या सुचनेनसार राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर निवड करण्यासाठी कार्यक्रम जाहीर झाला आहे. दि. 28 रोजी दुपारी 11 ते 2 या वेळेत प्रांत कार्यालयात अर्ज दाखल करणे, अर्ज छाननी झाल्यानंतर दि.29 रोजी दुपारी 2 वाजता छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात नगराध्यक्षा माधवी कदम याच्या अध्यक्षेखाली सभा होणार आहे. सभेमध्ये बाळासाहेब ढेकणे यांची पुन्हा एकदा स्वीकृत नगरसेवक म्हणून दिसणार आहेत.
ॲड. बनकर यांच्याकडून सुतोवाच
सातारा विकास आघाडीचे पक्षप्रतोद ॲड. दत्तात्रय बनकर यांच्याकडून बाळासाहेेब ढेकणे यांच्या नावावर सुतोवाच करण्यात आले आहे. त्यामुळे बनकर यांनीच खासदार उदयनराजेंच्याकडे नाव अंतिम करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता ढेकणे यांच्या नगरसेवकपदाच्या निवडीची केवळ औपचारिकता उरली आहे.
उपाध्यक्ष मनोज शेंडे यांनी अगोदरच दिल्या शुभेच्छा
उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांच्या निवडीच्या दिवशीच बाळासाहेब ढेकणे यांनी जादूकी झप्पी देवून शुभेच्छा दिल्या होत्या. त्याचवेळी बाळासाहेब ढेकणे हे सभागृहात दिसणार आहेत, हे उपस्थित सगळ्यांनी जाणले होते. त्याचवेळी शेंडे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या.