पन्हाळा/प्रतिनिधी
सातार्डे ता.पन्हाळा येथे अनिता अशोक पाटील या महिला पोलिस पाटील यांच्यासह अन्य दोघांच्यावर काठी, कुऱ्हाडीने मारहाण झाल्याची घटना घडली. याबाबत वैभव राजाराम नाळे, सतिश संभाजी नाळे, शामराव दाजी नाळे, विक्रम दगडु नाळे, सचीन संभाजी नाळे, अरुण दाजी नाळे सर्व रा. सातार्डे यांच्यावर पन्हाळा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
पोलिसांकडुन मिळालेली अधिक माहिती अशी की, अनिता अशोक पाटील या सातार्डे गावाच्या पौलिस पाटील आहेत. त्यानुसार गावातील मयत दगडु पांडुरंग पोवार यांच्या चौकशीकरता अनिता पाटील या आरोपी विक्रम नाळे यांच्या घराजवळ जावुन त्यांना पोलिस ठाण्यात बोलविले आहे. असे सांगत असताना विक्रम नाळे, सतिश नाळे यांनी पोलिस पाटील अनिता यांना तुम्ही आम्हाला कोण सांगणार, आम्ही बघुन घेतो, असे म्हणुन शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. त्यानंतर पोलिस पोटील अनिता पाटील या घरी परत आल्या असता त्यांच्यापाठोपाठ गुन्ह्यातील सर्व आरोपी हे काठ्या, कुऱ्हाड हातामध्ये घेवुन जमावबंदी आदेश असताना देखील जमाव करुन घरासमोर येवुन अनिता पाटील, अशोक पाटील, अशोक ऩाईक या तिघांना मारहाण केली. यामध्ये हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबतची फिर्याद पोलिस पाटील अनिता पाटील यांनी दिली असुन सरकारी कामात अडथळा व सरकारी कर्मचारीला मारहाण झाल्या बद्दल तसेच विविध कलमातंर्गत गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक प्रमोद सुर्वे करत आहे. दरम्यान महिला पोलिस पाटील यांच्यावर हल्ला झाल्याने या घटनेचा तालुक्यातुन तीव्र निषेध होत आहे.