वार्ताहर / वाठार-किरोली
सहकारी सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम व खासगी बँका, सहकारी बँका दि. २२ मे २०२१ रोजीच्या आदेशान्वये १ जून २०२१ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. तथापी जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी दि. २५ मे २०२१ रोजीपासून १ जून रोजीच्या सकाळी ७ पर्यंत या कालावधीत फक्त एटीएममध्ये पैसे भरणे, चेक क्लिअरन्स, डाटा सेंटरशी संबंधित बँकांचे कामकाज कार्यालयीन कामकाजा दिवशी सकाळी ११ ते दुपारी १ या कालावधीत चालू ठेवण्यास परवानगी दिली आहे. तसेच बँकांचे सर्व उर्वरित कामकाज पूर्णपणे बंद राहील. याबाबतचे आदेश जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी आज जारी केले आहेत.