पालिकेच्या आरोग्य विभागाकडे डॉग व्हॅनच नाही
दोन दिवसांपूर्वी एका दुचाकी चालकास भटक्या कुत्राने घेतला चावा
निर्बिजिकरण केल्याचे काही वर्षापूर्वीचे बिल अडकल्याची आरोग्य विभागात चर्चा
प्रतिनिधी / सातारा
कोरोनाची सातारा शहरवासियांच्या मनात चांगलीच धडकी भरली आहे. असे असताना शहरातील रस्त्यावर भटकी कुत्री, गाढवे यांची मोठी संख्या दिसू लागली आहे. अगदी पोवई नाक्यावर तर दोन दिवसांपूर्वी एका दुचाकी चालकाला भटक्या कुत्राने चावा घेतल्याची घटना घडली. पालिकेच्या आरोग्य विभागाकडे भटक्या कुत्र्यांवर उपाययोजना करण्याची यंत्रणाच नाही. काही वर्षांपूर्वी शहरात राबवण्यात आलेली निरबीजिकरण मोहिमेचे काम करणाऱ्या ठेकेदाराचे अजून बिल काढले नसल्याचे आरोग्य विभागात जोरदार चर्चा सुरू आहे.
शहरातल्या कोणत्याही रस्त्यावर भटक्या कुत्री, गाढवे यांची संख्या वाढू लागली आहे. गेल्या पाच महिन्यात लॉकडाऊनमध्ये शहरातील रस्ते शुकशुकाट होते. आता थोडी तुरळक गर्दी रस्त्यावर दिसू लागली आहे. मात्र, त्या वाहनधारकांना कोरोना इतकीच भटक्या कुत्र्याची आणि गाढवांची आहे. पालिकेकडे भटक्या कुत्र्यावर आळा घालण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी यंत्रणाच नाही. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी प्रादुर्भाव वाढू लागला आहे. पालिकेने पाठीमागे शहरात निरबीजिकरण मोहीम राबविण्यात आली होती. त्याचे बिलच काढले नव्हते अशी चर्चा जेव्हा जेव्हा शहरातील भटक्या कुत्र्यांच्या प्रश्न उपस्थित होतो तेव्हा घडते. नगरसेवक धनंजय जांभळे यांनी ही निवेदन दिली आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाकडे डॉग व्हॅन नाही, अशी शोकांतिका व्यक्त होत आहे.