प्रतिनिधी/ सातारा
आजकाल साताऱयातील मुलींनी विविध क्षेत्रात गरूड झेप घेतली आहे. यापैकी एक उदाहण म्हणजे शाहुनगर येथील प्रियांका तोरसकर, पण प्रियांकाने निवडलेली वाटचाल ही अगदी वेगळी आहे. तिने ‘मॉडलिंग’ या क्षेत्रात आपला पाया रोवला आहे. नुकतीच तिची ‘सायलिंग स्टार मिस इंडिया’ या स्पर्धेच्या अंतिम फेरी साठी तीची निवड झाली आहे. या स्पर्धेत संपुर्ण देशातुन 20 स्पर्धकांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रा बाहेरील ही अनेक मुलींनी सहभाग घेतला असुन साताऱयातुन प्रियांकाची निवड झाली आहे.
या स्पर्धा पुणे येथे दि. 8 डिसेंबर रोजी होणार आहेत. प्रत्येक स्त्री ही सुंदर असते, पण आपल्या सौदर्याचे प्रतिनिधीत्व करून सौंदर्यवतींसाठी आयोजित स्पर्धांमध्ये सहभाग घेणाऱया क्वचितच असतात. यापैकी एक म्हणजे सातारा येथील प्रियांका होय. लहान पणापासुनच दिसायला अगदी गोड असल्याने तिला अनेकांकडून मॉडलींग मध्ये जाण्याचा सल्ला देण्यात येत होता. हळूहळू तिला ही या क्षेत्राविषयी अवड निर्माण होत गेली, आणि मागील तीन वर्षापासुन तीने ‘मॉडलींग’ या क्षेत्राच्या माध्यमातुन होणाऱया विविध स्पर्धामध्ये भाग घेऊन यश पटकाविले आहे. यापुर्वी टॅलेंट ऑफ महाराष्ट्र, इंडिया मिस महाराष्ट्र-2019 ची विजेती ठरली होती. अनेक कपडय़ांच्या बँडमध्ये ही तिचा सहभाग आहे.
तिचे शालेय शिक्षण जिजामाता कन्या शाळा, करंजे येथे तर महाविद्यालयीन शिक्षण एलबीएस कॉलेज येथुन झाले. प्रारंभी कुटुंबियातील सदस्यांना प्रियांकाने हे वेगळे क्षेत्र निवडल्याबद्दल त्यांचा विरोध होता. पण एकदा तिने आपली आई रंजंना यांना आपल्या स्पर्धे दरम्यान घेऊन गेली. त्यावेळी त्यांना जाणीव झाली की खरोखरच आपली मुलगी जे काही करते ते योग्यच आहे. येथे महिलांना मिळणारा मान, सन्मान पाहुन त्या भारावुन गेल्या, आणि हळूहळू घरातील सर्वच सदस्यांना प्रियांकाच्या या कलेविषयी आदर वाटू लागला. त्याचबरोबर प्रियांकाने स्पर्धा जिंकल्यानंतर तीचे सर्वत्र कौतुक व तिच्या नावचे बॅनर झळकु लागल्याने सर्वांनाच तिचा हेवा वाटु लागला.
तस पाहिलं तर तिचे वडील भालचंद्र हे रेल्वे ती सेवानिवृत्त अधिकारी, आणि इतर भावडं व वडीलधारी माणसं हे ही विविध अशा शासकीय सेवेतील. त्यामानाने प्रियकांने निवडलेली ही वाटचाल सर्वात वेगळी व अनोखी आहे. प्रियांकाची सध्या या स्पर्धेमध्ये निवड झाल्याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेमध्ये ही उतरण्याची ईच्छा आहे. तसेच मॉडलिंग बरोबरच ती उद्योजिका ही असुन सध्या तिचे साताऱयात मॉडेल नावाचे शॉप ही आहे.
आपण कसं रहायचं हे या क्षेत्रातुन कळतं. आपण छान दिसता पण आणखीन आपण कसं छान दिसु शकतो, हे या माध्यमातुन कळतं त्याचबरोबर आपल राहणिमान ही उंचावत. त्यामुळे ईच्छुकांनी या क्षेत्राकडे जरूर वळाव, हे एक मानाचं क्षेत्र आहे. येत्या काही दिवसात मी साताऱयात ही मॉडलींगची स्पर्धा भरविणार असुन जेणे करून साताऱयातील युवक-युवतींच्या कलागुणांना वाव मिळेल.
प्रियांका तोरसकर