प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहर व परिसरातीला जुगार अड्डय़ांवर गेल्या काही दिवसांपासून जोरदार कारवाया सुरु आहेत. दि. 7 रोजी देखील सातारा शहर परिसरातील चार जुगार अड्डय़ावर छापे टाकून शहर पोलीस ठाणे व शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱयांनी आठजणांवर कारवाई केली आहे. या छाप्यात एकूण रोख रक्कम 3 हजार रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.
गोडोली येथील साईबाबा मंदिर परिसरात कमानीसमोर पत्र्याच्या शेडमध्ये अभिषेक गुलाब हावळे (वय 21, रा. धनगरवाडी, ता. सातारा) व सनी भिसे (रा. बुधवारनाका, सातारा) हे जुगार अड्डा चालवत होते. त्यांच्यावर कारवाई करत त्यांच्या ताब्यातील रोख 520 रुपये, जुगाराचे साहित्य जप्त केले. तर राष्ट्रीय महामार्गावर हॉटेल प्रीतीच्या पाठीमागे फतिजा कंपनीच्या गेटसमोर मटका घेणाऱया महेश दिनकर भोईटे (वय 27 रा. कोडोली, सातारा) व चंदू चोरगे (रा. रविवार पेठ, सातारा) यांच्यावर कारवाई करुन त्यांच्याकडील रोख 810 रुपये व जुगाराचे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.
तर शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱयांनी भू विकास बँक चौकातील शाहू स्टेडियमजवळ लप्झरी बसच्या आडोशाने मटका चालवणाऱया इप्बाल पापा झेंडे (वय 40 रा. मंगळवार पेठ, सातारा व यासिन इप्बाल शेख रा. गुरुवार पेठ, सातारा) यांच्यावर कारवाई करत त्यांच्या ताब्यातील रोख रक्कम 1 हजार 15 रुपये जुगाराचे साहित्य जप्त केले. महानुभव मठासमोर मटका चालवणाऱया प्रकाश तात्याबा इंगळे (वय 58 रा. पिंपळवाडी, ता. सातारा) व समीर सलीम कच्छी (रा. यश ढाब्याच्या मागे, मोळाचा ओढा, सातारा) यांच्यावर कारवाई करत त्यांच्या ताब्यातील 622 रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केले आह