प्रतिनिधी/ सातारा
केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू ठेवण्याचे आदेश असतानाही सातारा शहरातील पाच ज्वेलर्स चालकांनी दुकाने सुरू ठेवल्याने त्यांच्यावर शाहुपुरी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जिल्हाधिकारी यांनी केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू ठेवण्याचे आदेश दिले असतानाही दि.12 रोजी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास शनिवार पेठ, सातारा येथील पलाश ज्वेलर्स, घोडके सराफ आणि लाभलक्ष्मी ज्वेलर्स ही तीन ज्वेलर्सची दुकाने सुरू ठेवल्याची तक्रार पोलीस कॉन्स्टेबल पंकज मोहिते यांनी शाहुपुरी पोलिस ठाण्यात दाखल केल्यानंतर पलाश प्रफुल्ल नागोरे (वय 25) रा. शनिवार पेठ, सातारा. अखिल निवास शेख (वय 25) रा. म्हसवे , ता. सातारा. विशाल लघुशिंदे, रा. सदरबझार, सातारा. प्रियांशू अतुल घोडके (वय 22) रा. शनिवार पेठ, सातारा. कालुसिंग जिवासिंग देवल (वय 40) रा. सदाशिव पेठ, सातारा यांच्यावर शाहुपुरी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.