शहर, तालुका पोलिसांची कारवाई- दोन हॉटेलवर गुन्हा
प्रतिनिधी/ सातारा
लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्यात आल्यानंतर सातारा शहर व परिसरात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरुच ठेवला आहे. दि. 16 रोजी देखील सातारा शहर व तालुका पोलिसांनी 15 जणांवर आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले असून यामध्ये दोन हॉटेल्सचाही सहभाग आहे.
जिल्हाधिकाऱयांनी दिलेल्या संचारबंदी आदेशाचे उल्लंघ्घन करत तसेच हॉटेल सुरु ठेवून पार्टी करणाऱया पाचजणांवर सातारा तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यांच्यावर तसेच हॉटेलमालकावर आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दि. 16 रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास पेट्रोलिंग करताना पोलिसांना सैदापूर, ता. सातारा गावच्या हद्दीतील हॉटेल अभिराज सुरु असल्याचे निदर्शनास आले. तिथे पाहणी केली असता प्रसाद अनिल जाधव (वय 24, रा. दरे, ता. सातारा), सागर विजय शेलार (वय 28, रा. आकाशवाणी झोपडपट्टी, सातारा), सागर यशवंत गाडे (वय 34, रा. गुरुवार पेठ, सातारा), अनुप दत्तात्रय ननावरे (वय 35, रा. सैदापूर, ता. सातारा), व अभय प्रदीप फाळके (वय 22 रा. सातारारोड, ता. कोरेगाव) तिथे पार्टी करत होते.
पोलिसांनी या पाचजणांसह हॉटेलमालकावर कारवाई केली असून त्यांच्याविरुध्द कॉन्स्टेबल संतोष गडदे यांनी तक्रार दिली आहे. या गुन्हय़ाचा पुढील तपास हवालदार कदम करत आहेत.
कमानी हौद परिसरात तिघांवर कारवाई
कमानी हौद परिसरात जिल्हाधिकायांच्या आदेशाचे उल्लंघन करत विनाकारण फिरणाया जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलझाला आहे. पोलीस कॉन्स्टेबल अमोल लोहार यांनी याबाबतची तक्रार दिली आहे. रामचंद्र दादू माने (वय 41, रा. सहयोग निवास, गोडोली, सातारा), अक्षय अभयराज हसूले (वय 25, रा. 263, आनंदवन अपार्टमेंट, व्यकंटपूरा पेठ, सातारा), विश्वास भगवान नारकर (वय 46, रा. 410 सोमवार पेठ, सातारा), जहांगिर अजीज मुल्ला (वय 45, रा. 33, मल्हारपेठ, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. अधिक तपास पोलीस हवालदार भिसे करत आहेत.
हॉटेल मीन बारवर पोलिसांची कारवाई
हॉटेल व्यवसायिकांना फक्त घरपोच पार्सल सुविधेस परवानगी दिलेली असताना दि. 16 रोजी रात्री 12 वाजता साताऱयातील एमआयडीसीतील हॉटेल मीन बार सुरु ठेवल्याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी महेंद्र नागेश नाईक (वय 57, रा. साई कॉलनी, शाहूनगर, गोडोली, सातारा) यांच्यावर आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. कॉन्स्टेबल अभय साबळे यांनी तक्रार दिली असून हवालदार भिसे पुढील तपास करत आहेत.
शहर पोलिसांची सहाजणांवर कारवाई
बाँबे रेस्टारंट चौकात विनाकारण दुचाकीवरुन फिरणाऱया अभिषेक जितेंद्र शिवदास (रा. सत्यमनगर, सातारा), जगराम मिर्जाराम वर्मा (रा. दौलतनगर, सातारा), दिनेश नामदेव माने, (रा. आदित्यनगरी, सातारा), अतिष गौतम राजगुरु रा. दौलतनगर, सातारा), ज्योती महेंद्र पवार (रा. गुलमोहर कॉलनी, सातारा), आकाश यशवंत तोडादार (रा. गुरुवार बागेजवळ, सातारा) यांच्यावर कारवाई करण्यात आली. पोलीस नाईक उदयसिंह जाधव यांनी तक्रार दिली असून हवालदार भिसे पुढील तपास करत आहेत.