सातारा शहर, शाहूपुरी पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी/ सातारा
साताऱयात विनाकारण दुचाकी फिरवून संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सातारा शहर, शाहूपुरी, सातारा तालुका पोलिसांनी कारवाई करण्याचा सपाटा सुरु केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अनेकांवर दंडात्मक, प्रतिबंधात्मक तसेच काहीजणांच्या दुचाकी जप्त करण्याची कारवाई केली आहे.
कोविडचा संसर्ग वाढू नये लॉकडाऊन सुरु असतानाही बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात दुचाकी चालवून आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गोविंद शेखर झडगे (वय 21, रा. लक्ष्मीटेकडी, सदरबझार, सातारा), बाळकृष्ण गुलाब साळुंखे (वय 45, रा. कुशी, ता. सातारा) या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची तक्रार पोलीस हवालदार सतीश साबळे यांनी दिली असून अधिक तपास पोलीस हवालदार पी. एल. भिसे करत आहेत.
पोवई नाका परिसरात विनाकारण दुचाकी फिरवणाऱया लक्ष्मण भिकू जाधव (वय 29, रा. कामाठीपुरा मठाजवळ, ता. सातारा), शेखर गुलाबराव मोरे (वय 38, रा. 199, पाण्याच्या टाकीजवळ, गोडोली, सातारा) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची तक्रार पोलीस हवालदार संतोष इष्टे यांनी दिली असून अधिक तपास पोलीस नाईक आर. व्ही. घाडगे करत आहेत.
पोवई नाका परिसरात विनाकारण दुचाकी फिरवून जिल्हाधिकाऱयांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी किरण दत्तात्रय गोडसे (वय 30, रा. जानाई मळाई मंदीर, खिंडवाडी, ता. सातारा), उमेश शांताप्पा कैनुर (वय 39, रा. लक्ष्मी मंदिराजवळ, लक्ष्मीटेकडी, सातारा), सुजाता धंनजय देगांवकर (वय 40, रा. कुंभारवाडा, केसरकर पेठ, सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची तक्रार पोलीस नाईक सचिन पोळ यांनी दिली असून अधिक तपास पोलीस हवालदार कारळे करत आहेत.
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात विनाकारण दुचाकी फिरवणाऱया अमृत अर्जून कुंभार (वय 31, रा. आदित्यनगर, सातारा), साहिल इन्नुस आत्तार (वय 26, रा. शेंद्रे, ता. सातारा), सागर बाबासो फरांदे (वय 27) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची तक्रार पोलीस नाईक अब्दूल खलिफा यांनी दिली असून अधिक तपास पोलीस नाईक आर. व्ही. घाडगे करत आहेत.