प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहर व परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला असून नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असे आदेश असताना देखील दुकान उघडे ठेवणाऱया तसेच मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडून कोरोना संसर्गातील आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाणे व शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱयांनी 18 जणांवर कारवाई करुन त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 24 रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास शिवराज तिकाटणे ते खिंडवाडी रस्त्यावर मॉर्निंग वॉक करणाऱया सूरज शरद पोळ, (रा. गोळीबारा मैदान, शुभम मोहन घोरपडे (रा. शाहूनगर, गोडोली), अनिल डांगे (रा. शाहूनगर, गोडोली), प्रथमेश सुनील भोसले (रा. त्रिमूर्ती कॉलनी, गोडोली, सातारा), ऋषीकेश अंकुश गायकवाड (रा. विलासपूर, सातारा), ओमकार जांभळे, शुभम सुनील लोंढे (रा. शाहूनगर, गोडोली, सातारा), अमित सुधाकर आपटे (रा. रामाचा गोट, सातारा), अमितराव शंकरराव जाधव (रा. साईबाबा मंदिर, गोडोली, सातारा, दिलीप दादासो जोशी, (रा. साईबाबा मंदिर, गोडोली, सातारा), सूरज शरद पोळ (रा. गोळीबार मैदान, योगेश सुरेश तारळकर (रा. रामाचा गोट, सातारा), अर्थव रमेश बर्गे, (रा. प्रताप कॉलनी, एमआयडीसी, सातारा), विशाल लालासो जगदाळे (रा. कर्मवीरनगर, सातारा, अजिंक्य रामचंद्र बाबर (रा. विसावानाका, गोरखपूर, सातारा), अनिल डांगे (रा. शाहूनगर, गोडोली, सातारा) यांनी विनाकारण मॉर्निंगसाठी बाहेर पडून आदेशाचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस हवालदार संतोष कचरे, विशाल धुमाळ, कृष्णदेव शेडगे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केलेली आहे. तर शाहूपुरी पोलीस ठाण्यात दोन दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यामध्ये राहूल बाळासो पवार (रा. यवतेश्वर, ता. सातारा) यांनी निलम मसाला ड्रायफूटर्स दुकान सुरु ठेवले होते. संतोष किसन जाधव (रा. अंबवडे, ता. सातारा) व सुशील रामचंद्र गायकवाड (रा. व्यंकटपुरा पेठ, सातारा) यांनी रंगाचे दुकान सुरु ठेवले होते. त्यांच्याविरुध्द हवालदार विश्वनाथ मेचकर यांनी फिर्याद दिल्यानंतर या तिघा दुकानदारांवर आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.