इतर जिल्हय़ाच्या तुलनेत केवळ 23 मेट्रीक टन ऑक्सिजनचा पुरवठा
प्रतिनिधी /सातारा
कोराना ग्रस्त बहुसंख्य रूग्णांमध्ये ऑक्सिजनच्या कमतरते अभावी रूग्णांच्या मृत्यूदरात वाढ झाली असल्याचे निदर्शनात येताच. शासनातर्फे राज्यांतर्गत प्रत्येक जिल्हय़ाला ऑक्सीजनचा साठा पुरवण्यात येत आहे. सध्याची एकंदरीत आकडेवारी पाहता पश्चिम महाराष्ट्रात कोरोना रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस चढ-उतार झालेला पाहण्यात येतो. सातारा जिल्हय़ाही पश्चिम महाराष्ट्राचाच भाग असुन एकंदरीत इतर जिल्हय़ात पुरविण्यात येणाऱया ऑक्सिजनचे प्रमाण पाहता साताऱयात सर्वात कमी केवळ 23 मेट्रीक टन इतकाच ऑक्सीजनचा पुरवठा करण्यात येत आहे. राज्यातील इतर जिल्हय़ाचे प्रमाण पाहता साताऱयात अत्त्यल्प ऑक्सिजचा पुरवठा करण्यात येत आहे.
त्यातच अद्याप ही कोरोनाची टांगती तलवार कायम असुन सक्रिय रूग्णांच्या दराबरोबर रूग्ण दगावण्याचे प्रमाण ही अद्याप कायम आहे. त्यातच आता संभाव्य तिसऱया लाटेची शक्यता ही वर्तविण्यात येत आहे. अशा परिस्थितीत रूग्णांचे जिव वाचविण्यासाठीचा महत्वाचा भाग असणारे ऑक्सिजनचा पुरवाठाच जिल्हय़ाला अत्त्यल्प होत असल्याने तिसऱया लाटेत ऑक्सिजनाचा तुटवडा भासण्याची दाट शक्यता आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने ही गांभिर्याने पाहणे गरजेचे आहेत. आत्ताच सतर्कता बाळगुण सध्या पुरविण्यात येत असलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण वाढविण्याची गरज आहे.
जिल्हय़ात कोरोनाच्या दुसऱया लाटेत ऑक्सिनच्या कमतरते अभावी अधिक रूग्ण दगाविल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यातच कित्तेक रूग्णांनातर ऑक्सिजनचे बेडच उपलब्ध झाले नव्हते. यातच बुलढाण्यासाख्या लहान जिल्हय़ाला 60 मेट्रीक टन इतका ऑक्सिजन साठा पुरविण्यात येतो. त्याच्या तुलनेत साताऱयाला निम्मादेखील ऑक्सिजन साठा पुरविण्यात येत नाही. यातच जिल्हा रूग्णालयातर्फे येत्या काही दिवसातच कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन बेडची संख्या वाढविण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात येते. पण ऑक्सिजनचा साठाच अत्त्यल्प असल्यास हा बेड तरी काय कामाचा.
पॉझिटीव्हिटी दर अधिक असुनही जिल्हय़ात अद्यापही अत्त्यल्प ऑक्सिजन साठा होत आहे. सध्या साताऱया बरोबरच पुणे, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, बीड व अहमदनगर या भागात अद्याप ही पॉझिटिव्हिटी दर अधिक आहे. पण इतर जिल्हय़ाच्या तुलनेत सातारा जिल्हय़ाला सर्वात कमी ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील ऑक्सिजन साठा (मेट्रीक टन)
- पुणे-1183
- कोल्हापूर-35
- सांगली-60
- सातारा-23
- सोलापूर-65