प्रतिनिधी/ सातारा
जानेवारी महिन्यामध्ये सातारा शहरातील बाधित वाढीची संख्या पहाता 3118 जणांचे स्व्<ाŸब तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी केवळ 2397 जण पॉझिटीव्ह आले असून त्यापैकी सोमवारी केवळ 167 जण बाधित आढळून आले. शहरातील एकाचा आज मृत्यू झाला असून डेथ रेट 0.1 वर आहे. बरे झालेल्यांची संख्या 1285 वर असून रिकव्हरी रेट 53.61 वर आहे. सध्या होम आयसोलेशनमध्ये 1066 जण आहेत, असे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पवार यांनी सांगितले.
सातारा शहराची लोकसंख्या 1 लाख 71 हजार आहे. त्यापैकी 45 वर्षावरील लोकसंख्या 45 हजार 438 जण आहेत. दि. 28 नोव्हेंबर 21 पासून शहरात 202 जण परदेशातून आले आहेत. त्यापैकी 11 जण होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत. होम कोरोनटाईन पूर्ण झालेले 191 जण आहेत. 177 जणांचे स्वॅब घेतले असून केवळ चार जण आरटीपीसीआर पॉझिटीव्ह आढळून आले. 175 जण निगेटीव्ह संख्या आहे. सोमवारी केवळ 167 जण बाधित आढळून आले. प्रगतीपर बाधित रुग्ण 2397 जण आहेत. मृतांची संख्या 1 असून आजपर्यंत 3 जणांचा मृत्यू झालेला आहे. डेथ रेट 0.1, बरे झालेल्यांची संख्या 1285 असून रिकव्हरी रेट 53.61 वर आहे. सध्या होम आयसोलेशनमध्ये 1066 जण आहेत. सिव्हीलमध्ये 10 जण, खाजगी हॉस्पिलटमध्ये 32 जण, एकूण 42 जण, कोरोना केअर सेंटर माहुली येथे एक जण उपचार घेत आहेत, असे त्यांनी सांगितले.
शहरात कस्तुरबा आणि गोडोली येथे लसीकरण सुरु आहे. कस्तुरबामध्ये लसीकरण उद्दीष्ठ 4135 पैकी 2788 लसीकरण झाले असून 67.65टक्के प्रमाण आहे. गोडोली केंद्रावर 4135 पैकी 2564 लसीकरण झाले असून 62.01 टक्के झाले आहे.