प्रतिनिधी/ सातारा
शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱयांन जुगार अड्डय़ांवरील छापासत्र सुरुच ठेवले असून शनिवारीही ठिकठिकाणी धाडी टाकून सहाजणांवर गुन्हे दाखल केले आहेत. या सर्वांना सीआरपीसी 41 (1) अंतर्गत नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान, यापैकी एकावर दोन गुन्हे दाखल झाले आहेत.
सातारा शहरातील मंगळवार पेठेतील होलार गल्ली येथील दत्तमंदिराच्या शेजारी बोळातील एका भिंतीच्या आडोशाला सुरु असलेल्या जुगार अड्डय़ावर धाड टाकून शाहूपुरी पोलिसांनी 375 रुपयांची रोकड आणि जुगारचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी स्वरुप विजय कांबळे (वय 27, रा. मंगळवार पेठ, सातारा) आणि समीर सलीम कच्छी (रा. यश ढाब्याच्या पाठीमागे, मोळाचा ओढा, सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा शहरातील समर्थ मंदीर चौकातील नवगृह मंदिरालगत असलेल्या पानटपरीच्या आडोशाला सुरु असलेल्या जुगार अड्डय़ावर धाड टाकून शाहूपुरी पोलिसांनी सचिन विष्णू नलवडे (वय 32, रा. 439, मंगळवार पेठ, सातारा), शुभम महेंद्र गंगावणे (वय 23, रा. करंडी, ता. जि. सातारा) आणि यासीन इकबाल शेख (रा. 426, शनिवार पेठ, सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल केला. या कारवाईत पोलिसांनी 737 रुपयांची रोकड आणि जुगाराचे साहित्य जप्त केले.
सातारा शहरातील बसस्थानक परिसरातील सम्राट वडापाव शेजारील आडोशाला जुगार अडड्डय़ावर धाड टाकून शाहूपुरी पोलिसांनी 355 रुपयांची रोकड आणि जुगाराचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी संतोष बजरंग देशमुख (वय 35, रा. लक्ष्मीटेकडी, सदरबझार, सातारा) आणि यासीन इकबाल शेख (रा. 426, शनिवार पेठ, सातारा) या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.