प्रतिनिधी/ सातारा
येथील गुरुवार परजावर सार्वजनिक ठिकाणी दोन ट्रकच्या मध्यभागी भर दिवसा जुगार खेळणाऱया आठजणांवर सातारा शहर पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यांच्या ताब्यातील रोख रक्कम, जुगाराचे साहित्य, 7 मोबाईल व तीन दुचाकी असा एकूण 1 लाख 52 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 5 रोजी साताऱयातील गुरुवार परजावर खुलेआम जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तिथे छापा टाकला. यावेळी तिथे सार्वजनिक ठिकाणी उभ्या असलेल्या ट्रकच्या मध्यभागी जुगार खेळत असलेल्या आकाश सुनील चोरगे (रा. रविवार पेठ, सातारा), सईद जावेत कोतवाल (रा. राजसपुरा पेठ), राहूल प्रकाश घाडगे (रा. रविवार पेठ), परेश जावर शेख (रा. गुरुवार परज), सतीश संपत बोधे (रा. खेड, ता. सातारा), अजय बबन कोरडे (रा. गुरुवार परज), दस्तगीर ईसाक शेख (रा. खेड, ता. सातारा) व रियाज उस्मान शेख (रा. गुरुवार परज) यांच्यावर कारवाई करण्यात आली.
जुगाराचे साहित्य व मोबाईल जप्त
या छाप्यावेळी त्यांच्या ताब्यातील रोख रक्कम, जुगाराचे साहित्य, 7 मोबाईल व तीन दुचाकी असा एकूण 1 लाख 52 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून या सर्वांवर सीआरपीसी 41/1 प्रमाणे कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.