रक्तदानासाठी प्रत्येकाने पुढे यावे नगराध्यक्षा माधवी कदम
प्रतिनिधी/ सातारा
यावर्षी कोरोनामुळे सातारा शहरासह जिह्यात अंत्यत साध्या पद्धतीने दत्तजयंतीचा उत्सव साजरा करण्यात आला. सातारा शहरात विविध दत्त मंदिरात जन्मोत्सव सोहळा मोजक्याच व्यक्तींच्या उपस्थितीत करण्यात आला. सातारा बसस्थानकाबाहेर असणाऱया दत्त मंदिरात रक्तदान शिबिर घेवून यावर्षी दत्त जयंती साजरी करण्यात आली. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी नगराध्यक्षा सौ. माधवी कदम म्हणाले, रक्तदात्यांनी रक्तदानासाठी पुढे यावे असे आवाहन केले. दत्त जयंतीनिमित्त जिह्यात एक वेगळेच वातावरण असते. प्रत्येक दत्त मंदिरात दत्त जन्म सोहळा दरवर्षी आयोजित करण्यात येतो. काही गावांच्या यात्राही असतात. परंतु यावर्षी कोरोनामुळे अंत्यत साधेपणाने दत्त जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. त्यामध्ये सातारा येथील सैनिकनगरातील रिक्षा स्टॉपवर दत्त भक्तांनी दत्त मंदिराची स्वच्छता करुन विधीवतपणे पुजा करण्यात आली होती. सातारा बसस्थानकातल्या दत्त मंदिरात बस स्थानकातल्या कर्मचाऱयांनी दत्त जन्मोत्सव साजरा केला. बसस्थानकाबाहेर असणाऱया श्री.छ.प्रतापसिंह महाराज रिक्षा स्टॉप, दत्त मंदिर आणि अक्षय ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन नगराध्यक्षा सौ. माधवी कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेविका सिता हादगे, राम हादगे यांच्या रिक्षा संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्षा माधवी कदम म्हणाल्या, रिक्षा संघटनेने रक्तदानाचा उपक्रम कौतुकास्पद असा आयोजित करण्यात आला आहे. कोरोनामुळे रक्ताचा तुटवडा आहे. जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.